चंदगड तालुक्यात जंगमहट्टी जवळ कार पलटी; अपघातात बेळगांव येथील एक तरुणाचा मृत्यू.


जंगमहट्टीजवळ कारचा भीषण अपघात; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात युवकाचा मृत्यू

 चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी गावाजवळ मेगा कंपनीच्या समोरील वळणावर एक दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. रस्त्यात अचानक कुत्र्या आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली, या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, फिर्यादी रिक्षाचालक जखमी झाले आहेत.  

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री २१.२० वाजेच्या सुमारास फिर्यादी पप्पू गंगाराम भोसले (वय ४४, रा. ज्योतिनगर, गणेशपूर, रामघाट रोड, बेनकनहळळी, ता. जि. बेळगाव) आणि त्यांचे मित्र जयंत रामचंद्र कामु, विनायक नेताजी कलिंग, तसेच मयुर गुरबसय्या कांबळे हे सर्वजण चंदगडमधील आंबेवाडी गावाच्या धरणावर फिण्यासाठी गेले होते. आरोपी मयुर बसय्या कांबळे हा आपली ‘एम जी ॲस्टर’ (एम.जी. कार क्र. 22BH8822F) ही चारचाकी गाडी वेगाने चालवून बेळगाव-वेंगुर्ला मार्गे पाटणेफाट्यावरून आंबेवाडीकडे जात असताना ही दुर्घटना घडली.  

​जंगमहट्टी गावाजवळ आल्यावर अचानक कारसमोर कुत्रा आल्याने त्याला वाचवण्यासाठी आरोपी चालकाने गाडी बाजूला घेतली, मात्र यावेळी कारवरील ताबु सुटून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या कापलेल्या झाडाच्या बुंध्याला जोरदार धडकली आणि पलटी झाली. या भीषण अपघातात विनायक नेताजी कलिंग याला गंभीर मुक्का मार लागल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने उपचारासाठी बेळगाव येथील के.एल.ई. हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तसेच या अपघातात फिर्यादी पप्पू भोसले यांच्या डाव्या खांद्याला गंभीर मार लागला असून मयुर व जयंत यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.  

​या प्रकरणी फिर्यादी पप्पू भोसले यांच्या जबाबानुसार एम.जी. कारचा चालक मयुर बसय्या कांबळे याच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिेतेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोसई गंगेजे हे करत आहेत.  


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!