कर्नाटकातही जाहीर केला ४२०० रु. ऊस दर


कर्नाटकातही जाहीर केला ४२०० रु. ऊस दर

खानापूर: राजू कुंभार

कर्नाटकातही आता ४२०० रु. ऊस दर जाहीर केल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.निपाणी तालुक्यातील बेडकीहाळ येथील व्यंकटेश्वर साखर कारखान्याने चालू हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ४,२०० रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे. हा कर्नाटकातील साखर कारखान्यांमधील सर्वाधिक दर मानला जात आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या दरनिश्चितीच्या धर्तीवर शेतकऱ्यांना ही रक्कम तीन टप्प्यात देण्याचा निर्णय कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने घेतला आहे. याबाबत कारखान्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिकृत माहिती दिली आहे.

अशी असणार टप्प्यांची रचना:

पहिला टप्पा: प्रतिटन ३,८०० रुपये दिले जाणार आहेत.

दुसरा टप्पा: प्रतिटन १०० रुपये दिले जाणार आहेत.

तिसरा टप्पा: साखरेचा प्रतिकिलो दर ५० रुपयांपेक्षा अधिक झाल्यास अतिरिक्त ३०० रुपये देण्याचे कारखान्याने जाहीर केले आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या दराशी स्पर्धा करण्यासोबतच शेतकऱ्यांचे हित जपण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे कारखाना व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कर्नाटकात अशा प्रकारे विक्रमी दर जाहीर झाल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!