सोमवारी करंबळ येथे रंगणार ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ कार्यक्रम!


सोमवारी करंबळ येथे रंगणार ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ कार्यक्रम!

शिवगर्जना ढोल ताशा पथकाचा १० वा वर्धापन दिन सोहळा

खानापूर / प्रतिनिधी

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सांस्कृतिक परंपरेचा उत्साह वाढवण्यासाठी मौजे करंबळ (ता. खानापूर) येथे सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता ‘शिवगर्जना ढोल ताशा पथक’ च्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटन व प्रमुख उपस्थिती

या सोहळ्याचे उद्घाटन खानापूर तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठल सोमाप्पा हलगेकर यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्योतिर्लिग सोसायटीचे संस्थापक श्री. राजाराम नानाप्पा पाटील भूषवणार आहेत.

प्रमुख पाहुणे व दीपप्रज्वलन:

या सोहळ्याला परिसरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन व दीपप्रज्वलन करणार आहेत:

श्री. दिगंबरराव बशवंतराव पाटील (माजी आमदार, खानापूर)

श्री. अरविंद चंद्रकांत पाटील (माजी आमदार व डी.सी.सी. बँक संचालक)

श्री. रमाकांतदादा कोंडुस्कर (अध्यक्ष, श्री राम सेना हिंदुस्थान, बेळगाव)

सौ. धनश्री सरदेसाई (जनरल सेक्रेटरी भाजप बेळगाव जिल्हा)

विविध पूजन व धार्मिक कार्यक्रम:

कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते ढोल-ताशा पूजन, श्री गणेश पूजन, ध्वज पूजन, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तींचे पूजन आणि ग्रामदैवत पूजन पार पडणार आहे.

शिवगर्जना ढोल ताशा पथकाचे पदाधिकारी, सदस्य आणि समस्त करंबळ ग्रामस्थ या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेत आहेत. या दिमाखदार सोहळ्याला व ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व नागरिक, कलाप्रेमी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!