कुस्तीच्या पंढरीत नवा सूर्योदय: कोवाड येथे २० एकरात साकारणार भव्य व अत्याधुनिक क्रीडा संकुल!


चंदगड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण खेळाडूंना मिळणार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ; शासनाच्या २० एकर जमीन मंजुरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण.

चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

चंदगड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण क्रीडा विश्वासाठी एक ऐतिहासिक व क्रांतिकारी पाऊल उचलले गेले आहे. ‘कुस्तीची पंढरी’ अशी ख्याती असलेल्या कोवाड येथे एकात्मिक, भव्य आणि अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी राज्य शासनाकडून तब्बल २० एकर भूमी अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कोवाडसह संपूर्ण चंदगड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासाला एक नवी आणि भक्कम चालना मिळणार आहे.

​गुणवत्तेला मिळणार हक्काचे व्यासपीठ-

ग्रामीण भागात प्रतिभेची कोणतीही कमतरता नाही; परंतु आधुनिक प्रशिक्षण, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाअभावी अनेक होतकरू खेळाडू मागे पडतात. कोवाड येथे साकारणारे हे क्रीडा संकुल ग्रामीण भागातील या त्रुटींवर मात करण्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे. विशेषतः कुस्तीपटूंना त्यांच्या कुस्ती कौशल्याला जागतिक पातळीवर चमकवण्यासाठी एक हक्काचे आणि प्रगत व्यासपीठ लाभणार आहे.

​राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचे ध्येय-

केवळ कुस्तीच नव्हे, तर इतरही विविध क्रीडा प्रकारांतील उदयोजग गुणवत्तेला योग्य दिशा देण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे. ग्रामीण भूमिपुत्रांमधील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांना थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पटलावर पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश असून, चंदगड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा वैभवात भर घालण्यासाठी प्रशासन आणि नेतृत्व कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

​परिसरात आनंदाची व उत्साहाची लाट-

कोवाडसाठी २० एकर जागा मंजूर झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक क्रीडाप्रेमी, मल्ल, युवा खेळाडू आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या अत्याधुनिक क्रीडा संकुलामुळे कोवाडची पारंपारिक कुस्ती क्षेत्रातील ओळख आणखी अधिक बळकट होईल आणि भविष्यात येथून अनेक उच्चप्रतवारीचे खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा दृढ विश्वास व्यक्त केला जात आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!