
सोमवारी जटगे येथे माणसाने बैलगाडा ओढण्याच्या शर्यत
जटगे, ता. खानापूर येथे दिवाळी सणाचे औचित्य साधून एका माणसाने बैलगाडा ओढण्याच्या जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. युवा शक्ती मंडळ व ग्रामस्थ, जटगे यांच्या वतीने या खुल्या शर्यतीचे आयोजन केले आहे.
ही शर्यत सोमवार, दिनांक 09 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी ठीक 2 वाजता मौजे जटगे येथे होणार आहे. या शर्यतीसाठी प्रवेश फी 200 रुपये ठेवण्यात आली असून, सेन्सर टाईम पद्धतीने स्पर्धा होणार आहे.
बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे
पहिले बक्षीस 8000 रुपये, दुसरे बक्षीस 6000 रुपये, तिसरे बक्षीस 4000 रुपये, चौथे बक्षीस 2000 रुपये व पाचवे बक्षीस 1000 रुपये असे एकूण पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ही सर्व बक्षिसे आमदार श्री. विठ्ठल सो. हलगेकर, यांच्याकडून पुरस्कृत आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. मोहन आ. पाटील हे भूषविणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या अनोख्या शर्यतीचा लाभ जास्तीत जास्त स्पर्धकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक युवा शक्ती मंडळ, जटगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ: जटगे, ता. खानापूर | संपर्क – 8747057822, 8618746189
Advertise


