भाजपची गुरुवारी महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक
खानापूर: राजू कुंभार
भारतीय जनता पार्टी खानापूर मंडलच्या वतीने गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता एका महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक खानापूर येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडणार आहे.
बैठकीचा उद्देश व चर्चा:
संघटनेचे कार्य अधिक मजबूत करणे आणि आगामी उपक्रमांची आखणी करणे हा जरी प्रमुख विषय असला तरी आगामी तालुका, जिल्हा व ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.सद्या राष्ट्रीय पक्षांच्या बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांविषयी देखील सविस्तर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
उपस्थितीचे आवाहन:
या बैठकीस तालुक्यातील सर्व माननीय लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका भाजपा अध्यक्ष श्री. बसवराज सानिकोप, तालुका भाजपा प्रधान सरचिटणीस श्री. मल्लाप्पा मारीहाळ आणि श्री. गुंडू तोपिनकट्टी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थान: भाजप मध्यवर्ती कार्यालय, खानापूर
दिनांक: गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६
वेळ: सकाळी १०:३० वाजता
Advertise



