चन्नम्मा चषकावर ताराराणीच्या रणरागिणींची मोहोर!


चन्नम्मा चषकावर ताराराणीच्या रणरागिणींची मोहोर!

अंतिम सामन्यात बैलहोंगलला ६ गुणांनी नमवत विजेतेपद; ८ हजारांचे पारितोषिक पटकावले

खानापूर : कित्तूर उत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय राणी चन्नम्मा चषक कबड्डी स्पर्धेत मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूरच्या महिला संघाने दिमाखदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात बैलहोंगलच्या बलाढ्य संघाला ६ गुणांनी पराभूत करत संघाने भव्य चषकासह रोख ८ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले.

स्पर्धेत ताराराणीच्या खेळाडूंनी गदग संघाला १८ गुणांनी नमवत विजयी सुरुवात केली. त्यानंतर रामदुर्ग, कडोली, कोप्पळ, बिडदी, हुबळी, गोकुळ आणि बैलहोंगल या संघांवर मात करत विजेतेपदावर नाव कोरले. उत्कृष्ट चढाया, भक्कम बचाव आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर ग्रामीण भागातील या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची छाप पाडली.

या यशाबद्दल मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू (हलगेकर), प्राचार्य अरविंद पाटील, क्रीडा शिक्षक प्रशांत पाखरे, भीमसेन, भरमाजी पाटील, संचालक शिवाजीराव पाटील, परशराम गुरव तसेच प्राध्यापक वर्गाने विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

ताराराणीच्या या ऐतिहासिक विजयामुळे खानापूर तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!