
बेळगावात दि.३१ रोजी विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा
राजू कुंभार: खानापूर
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि विश्व भारत सेवा समिती, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी येत्या शनिवारी (ता. ३१) वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शहापूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात सकाळी ठीक ९ वाजता पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांत घेतली जाणार आहे:
प्राथमिक गट (इयत्ता ५ वी ते ७ वी):
या गटासाठी ‘मातृभाषेतील शिक्षण : काळाची गरज’, ‘माझे बालपण, माझे कुटुंब’, ‘माझा भारत आणि माझी जबाबदारी’ आणि ‘प्रदूषणमुक्त भारत’ हे विषय देण्यात आले आहेत.
माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी):
या गटासाठी ‘माझी मातृभाषा : २१ व्या शतकातील वाटचाल’, ‘आजचा तरुण आणि सोशल मीडियाचा विळखा’, ‘बदलाचे वारे आणि जेन झी’ तसेच ‘लोकशाही आहे कुठे? एक विचारमंथन’ या विषयांवर मत मांडण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी सीमाभागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी प्रकाश नंदिहळळी व मयूर नागेनहट्टी यांच्याशी संपर्क साधावा.

