सुमित कासरलेकरांचा लोंडा जि. पं आरक्षणावर आक्षेप; 


सुमित कासरलेकरांचा लोंडा जि. पं आरक्षणावर आक्षेप; 

खानापूर (ग्रामदूत न्यूज):

खानापूर तालुक्यातील लोंडा जिल्हा पंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणावर लोंडा येथील रहिवासी सुमित विठोबा कसारलेकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी राज्याच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाच्या सचिवांना लेखी आक्षेप पत्र सादर करून आरक्षणात सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

सचिवांना दिलेल्या निवेदनात सुमित कासारलेकर यांनी नमूद केले आहे की, लोंडा जिल्हा पंचायत मतदारसंघात हिंदू मराठा व मराठा समाजाच्या विविध उपजातींचे तब्बल ६० टक्के नागरिक निवास करतात. हा संपूर्ण समाज मागास ‘ब’ प्रवर्गाच्या आरक्षणासाठी पात्र आहे. असे असूनही १९९५ पासून आजतागायत या मतदारसंघात मागास ‘ब’ प्रवर्गासाठी एकदाही आरक्षण देण्यात आलेले नाही, ही अत्यंत अन्यायाची बाब आहे.१९९५ पासूनची आरक्षण स्थिती:या मतदारसंघाच्या आरक्षणाचा इतिहास मांडताना त्यांनी स्पष्ट केले की:

* १९९५: सर्वसाधारण प्रवर्ग

* २०००: सर्वसाधारण महिला

* २००५: मागास ‘अ’ प्रवर्ग

* २०११: सर्वसाधारण

* २०१६: सर्वसाधारण महिला

आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठीच आरक्षित करण्यात आला आहे. वारंवार एकाच पद्धतीचे आरक्षण पडत असल्यामुळे मागास ‘ब’ प्रवर्गातील नागरिक आपल्या राजकीय व सामाजिक हक्कांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या आरक्षणाचा फेरविचार करून मागास ‘ब’ प्रवर्गाला योग्य ते प्रतिनिधित्व द्यावे आणि “दुरुस्ती व सुधारणा” करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!