राजगोळी खुर्द येथील घटनेने शेतकरी चिंतेत; आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट.
चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द येथे ऊस रोपवाटिकेला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे रोपवाटिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता असून, या घटनेमागे जाळपोळीचा प्रकार असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

रोपवाटिकेतील ऊस रोपांना आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. मात्र, जाणीवपूर्वक आग लावण्यात आली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आगीचे नेमके कारण व नुकसानीचा अधिक तपशील तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Views: 138

