प्रेमविवाहाच्या रागातून चंदगडमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला.


पाटणे फाट्यावर दोघांकडून कोयता व विळ्याने वार; दोघांवर गुन्हे दाखल.

चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका २८ वर्षीय तरुणावर कोयता व विळ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना पाटणे फाटा येथे काल दुपारी घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून चंदगड पोलीस ठाण्यात दोन संशयितांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  व दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, वरगाव (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील अजय दत्तू नाईक (वय २८, व्यवसाय – शेती) यांनी  पत्नी निशा हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर दत्तू नाईक आणि अशोक रामू नाईक (दोघे रा. वरगाव, ता. चंदगड) हे फिर्यादीवर चिडून होते. 

 सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर २०२६) दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास अजय नाईक हे पाटणे फाटा येथील ‘शारदा मोबाईल शॉपी’ समोर आपले मित्र संदीप चव्हाण यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित आरोपी ज्ञानेश्वर नाईक आणि अशोक नाईक हे हातात कोयता व विळा घेऊन तेथे आले. “तू आणि तुझ्या पत्नीने केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून आज तुला जिवानिशी मारून टाकणार” अशी धमकी देत त्यांनी अजय यांना मोबाईल शॉपीसमोरील मोकळ्या जागेत ओढले.  

​त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर नाईक याने हातातील कोयत्याने अजय यांच्या डोक्यात आणि उजव्या हाताच्या मनगटाजवळ वार केले. तर अशोक नाईक याने विळ्याने त्यांच्या डोक्यात आणि मानेवर वार केले. या हल्ल्यात अजय नाईक यांच्या डोक्याला, मानेला, हाताच्या मनगटाला आणि पोटावर गंभीर दुखापत झाली आहे.

​या प्रकरणी फिर्यादी अजय नाईक यांच्या तक्रारीवरून चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीना अटक झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोसई) भोसले करत आहेत.  


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!