काँग्रेसमधील इच्छुकांनी झेडपी-टीपी साठी अर्ज करावे!


काँग्रेसमधील इच्छुकांनी झेडपी-टीपी साठी अर्ज करावे!

माजी आ डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनुसार आठ दिवसांत अर्ज सादर करण्याचे आवाहन

खानापूर : प्रतिनिधी

खानापूर तालुक्यात जिल्हा पंचायत (झेडपी) आणि तालुका पंचायत (टीपी) निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, महिला आणि युवकांना हे आवाहन करण्यात आले आहे.

झेडपी आणि टीपी निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आपले अर्ज ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांकडे सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे. अर्जासोबत इच्छुक उमेदवाराने पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, इच्छुक असलेल्या झेडपी किंवा टीपी नाव तसेच स्वतःचा थोडक्यात परिचय किंवा बायोडाटा जोडणे आवश्यक आहे.

सर्व इच्छुकांनी आपले अर्ज आठ दिवसांच्या आत ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांकडे जमा करावेत, अशी सूचना डॉ. निंबाळकर यांनी दिल्याचे आवाहनात नमूद करण्यात आले आहे.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून इच्छुकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने आगामी निवडणुकीसाठी पक्षांतर्गत तयारीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. आता कोणत्या मतदार संघातून किती इच्छुक अर्ज दाखल करतात आणि उमेदवारी निश्चित करताना पक्ष कोणती प्रक्रिया अवलंबतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertise

 


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!