औरनाळ फाट्यावर झाला होता अपघात ; अपघातानंतर प्रकृती खालावली होती.
शेंद्री प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
शेंद्री येथील सिद्धारूढ मठाचे मठाधिपती “परमपूज्य श्री मृत्युंजय महास्वामीजी” यांचे काल शुक्रवार दि: ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिजन,अनुयायी आणि परिसरातील मठातील भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी औरनाळ फाट्याजवळ हुंडाई आय-१० या चारचाकी वाहन चालवताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात परमपूज्य मृत्युंजय महास्वामीजी जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेहोते.
मात्र, त्यानंतर काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीत हळूहळू बिघाड जाणवू लागला. अपघातामुळे बसलेला मानसिक धक्का आणि त्यानंतर खालावत गेलेली प्रकृती यामुळे त्यांची तब्येत चिंताजनक बनली होती. अखेर आज सकाळी त्यांना हृदयावीकराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली.
परमपूज्य मृत्युंजय महास्वामीजी यांच्या निधनाने सिद्धारूढ मठाच्या भक्तपरिवारावर, शेंद्री व आजूबाजूच्या गावातील त्यांच्या हितचिंतकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना भाविक आणि अनुयायांकडून व्यक्त होत आहे.

