
खानापूर तालुका पंचायत समितीचे आरक्षण जाहीर!
महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गांसाठी जागा निश्चित
खानापूर : राजू कुंभार
खानापूर तालुका पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील २० गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीची तयारी सुरू होण्याची चिन्हे आहेत.
जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, काही गण महिलांसाठी राखीव झाले आहेत, तर काही गण सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय प्रवर्गांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांना आता आरक्षणानुसार आपली रणनीती आखावी लागणार आहे.
खानापूर तालुका पंचायत समिती : गणनिहाय आरक्षण
१ कणकुंबी प्रवर्ग अ (महिला)
२ जांबोटी सर्वसाधारण
३ नेरसा सर्वसाधारण (महिला)
४ निट्टूर प्रवर्ग ब (महिला)
५ हलकर्णी सर्वसाधारण
६ गलगुंजी प्रवर्ग अ
७ देवलत्ती सर्वसाधारण
८ पारिश्वाड सर्वसाधारण
९ हिरेमुन्नोळी सर्वसाधारण (महिला)
१० इटगी (सर्वसाधारण)
११ गंदिगवाड ,अनुसूचित जमाती (महिला)
१२ बीडी, सर्वसाधारण (महिला)
१३ केरवाड सर्वसाधारण
१४ कक्केरी अनुसूचित जाती (महिला)
१५ हलशी सर्वसाधारण (महिला)
१६ नंदगड अनुसूचित जाती
१७ हेब्बाळ प्रवर्ग अ (महिला)
१८ गुंजी प्रवर्ग अ
१९ लोंढा प्रवर्ग अ (महिला)
२० गोडदोळी प्रवर्ग अ
आरक्षणामुळे राजकीय हालचालींना वेग येणार!
पंचायत समितीच्या २० गणांचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या आशा-अपेक्षांना दिशा मिळाली आहे. महिला आरक्षणामुळे अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे. तर सर्वसाधारण आणि विविध आरक्षित प्रवर्गांतील गणांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीत विविध राजकीय पक्ष कोणत्या उमेदवारांना संधी देतात, तसेच स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणे जुळतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Advertise


