आमदारांच्या उपस्थितीत भाजपची स्वच्छता मोहीम


आमदारांच्या उपस्थितीत भाजपची स्वच्छता मोहीम

संकल्प अभियाना’अंतर्गत हब्बनहटी मारुती मंदिर व घाट परिसराची स्वच्छता; पदाधिकारी, बूथप्रमुखांसह कार्यकर्त्यांचा सहभाग

खानापूर : राजू कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेनिमित्त खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत श्री मलप्रभा तीर्थक्षेत्रातील स्वयंभू मारुती मंदिर तसेच घाट परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

या मोहिमेत भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, बूथप्रमुख, बीएलए-२ तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी हातात झाडू व स्वच्छता साहित्य घेऊन मंदिर परिसर आणि घाटाची स्वच्छता केली.

स्वच्छता मोहिमेत खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजप तालुका अध्यक्ष बसवराज सानीकोप, सेवा संकल्प अभियानाचे संचालक ज्योतीबा रेमानी, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल, रयत मोर्चाचे बेळगावी जिल्हा उपाध्यक्ष सदानंद पाटील, भाजप खानापूर मंडळाचे प्रधान सचिव मल्लाप्पा मारीहाळ, बेळगावी भाजप कार्यकारिणी सदस्य एम. डी. पाटील, युवा मोर्चा खानापूरचे अध्यक्ष किशोर हेब्बाळकर, प्रकाश गावकर (आमटे), भाजप युवा प्रमुख नंदगड रायनगवडा देमट्टी आणि कार्यालय सचिव रवी पाटील आदी उपस्थित होते.

याशिवाय रवी वडर, राजेंद्र लकेबैलकर, सागर देसाई, दौलत कोलेकर (जांबोटी), श्रीपाद भरणकर, सुनील देसाई, प्रकाश गावडे, नागेश सावंत, रमेश देसाई (नीलावडे), शिवराज लोकुळकर, अशोक गावकर, शिवाजी गुरव (गल्याळी) यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जांबोटी आणि कणकुंबी परिसरातील बीएलए-२, बूथप्रमुख तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. या उपक्रमातून धार्मिक स्थळ व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला.

Advertise


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!