चंदगड पोलिसांची धडक कारवाई: १७ लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त; एकूण २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.


शेवाळे गावच्या हद्दीत पोलिसांचा छापा; पिक-अप वाहनातून चाललेली बेकायदेशीर वाहतूक उघड, तिघांवर गुन्हा दाखल.

चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

          महाराष्ट्र शासनाचा महसूल व कर चुकवून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दारूमाफियांवर चंदगड पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास शेवाळे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) गावच्या हद्दीतील विलास शंकर तुपारे यांच्या शेतासमोरील रस्त्याकडेला ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १७ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या बेकायदेशीर दारूसह एकूण २३ लाख ८ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

​     चंदगड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शेवाळे गावच्या हद्दीत थांबलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो मॅक्स पिक-अप वाहनाची (क्रमांक MH-09-GJ-8571) पाहणी केली असता, त्यात विविध कंपन्यांच्या सीलबंद गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या व टिनचा मोठा साठा आढळून आला.  

​बेकायदेशीर दारूसाठा: विविध आकार व क्षमतेच्या हजारो बाटल्या असा एकूण १७,०१,१३० रुपये किमतीचा सीलबंद दारूचा साठा जप्त करण्यात आला.  

​वाहन व मोबाईल: दारू वाहतुकीसाठी वापरलेले ६,००,००० रुपये किमतीचे बोलेरो पिक-अप वाहन तसेच ७,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन (व्हिवो व सॅमसंग कंपनीचे) हस्तगत करण्यात आले आहेत.  

​आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल

​या प्रकरणी पोलिसांनी खालील तीन आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे:

१) जयवंत चाळू गावडे

२) सुधारक नामदेव गावडे

३) शिवाजी धाकलू गावडे

(सर्व रा. पाले, ता. चंदगड, जि. कोल्हापूर)  

​आरोपींनी संगनमत करून गोव्याहून आणलेल्या दारूची बेकायदेशीर विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. पोलीस छापा पडल्याचे लक्षात येताच १ क्रमांकाचा आरोपी जयवंत गावडे हा घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.  

​कायदेशीर कारवाई व पुढील तपास

​या कारवाईप्रकरणी पोलीस अंमलदार संग्रामसिंग जिजबा पाटील (पोकॉ २०६९, नेमणूक – चंदगड पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चंदगड पोलीस ठाण्यात प्रोव्ही. गु.र.नं. ३१८/२०२६ अंतर्गत:  

​महाराष्ट्र दारूबंदी कायदा: कलम ६५ [अ] [ई], ९०, १०८, ८३  

​मोटार वाहन कायदा: कलम २३९/१७७, ५०/१७७, १८४ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

​सदर गुन्ह्याची नोंद २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १५.३५ वाजता झाली आहे. दाखल अंमलदार म्हणून पो. हे. कॉ. (बकल नं. २०७९) चौगुले यांनी काम पाहिले असून, मा. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक एस. ई. भोसले हे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.  


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!