शिंदोळीसाठी उद्योगपती प्रसन्न घोटगे यांची मदत
शिलाई मशीनची भेट
शिंदोळी : गावातील गरजू नागरिकांना शिवणकामाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शिंदोळी येथील युवा कार्यकर्त्याने उद्योगपती श्री. प्रसन्न वासुदेव घोटगे (पी.व्ही.जी. सर) यांच्याकडे शिलाई मशीनची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पी.व्ही.जी. सरांनी शिंदोळी गावासाठी शिलाई मशीन भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी गौरीपूजनाच्या मंगलदिनी शिलाई मशीनची विधिवत पूजा करून ती शिंदोळी गावाला सुपूर्द करण्यात आल्या या माध्यमातून गावातील गरजू लोकांना शिवणकाम करता यावे तसेच महिलांना आणि युवकांना कौशल्याच्या आधारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शिंदोळी येथील वृद्धाश्रमाचे संस्थापक गजानन घाडी तसेच युवा कार्यकर्त्यांनी गावातील गरजू नागरिकांच्या हितासाठी ही मागणी केली होती. ती मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी पी.व्ही.जी. सरांचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमामुळे ग्रामस्थ, युवावर्ग तसेच महिलावर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले. गावातील गरजूंसाठी मशीन उपलब्ध करून दिल्याने हा उपक्रम रोजगारनिर्मिती आणि स्वावलंबनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Advertise…..



