माणिकवाडी नजिकच्या अपघातात दोघेही पतिपत्नी ठार 


माणिकवाडी नजिकच्या अपघातात दोघेही पतिपत्नी ठार 

खानापूर: राजू कुंभार

आज रात्री सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास माणिकवाडी परिसराजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. या अपघातात जटगा येथील रहिवासी आणि भारतीय सैन्यदलात (आर्मी) कार्यरत असलेले ऑन ड्युटी जवान युवराज मळीक (३०) आणि मोहिनी मळीक यांचा अपघात घडला होता यात दोघेही पती पत्नी ठार झाले आहेत.कालच हा जवान सुट्टीवर आला होता.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८:३० च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. मात्र युवराज हा जागीच ठार झाला तर मोहिणी हि दवाखान्यात मृत झाली. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertise


120
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!