मलगड फाट्यावरील अपघातात माणगावच्या चालकाचा मृत्यू


मलगड फाट्यावरील अपघातात माणगावच्या चालकाचा मृत्यू

चंदगड : स्वप्नील हणमंत कुंभार

चंदगड तालुक्यातील मलगड फाटा परिसरात ३१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.शिवाजी महादेव ससेमारी (वय ४०, रा. माणगाव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी ससेमारी हे होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एम.एच. ०९ डी. २५६८) वरून हॉटेल सहवास, हलकर्णी फाटा येथून जेवण करून माणगाव-तांबुळवाडी-जाणारे रोडमार्गे मलगड गावाच्या हद्दीतून जात होते. यावेळी मोटारसायकल वेगाने चालविताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या अपघातात फिर्यादी विलास शिवाजी घोडके (वय ३९, व्यवसाय सोलर वॉटर हीटर एजन्सी, रा. मलगड, ता. चंदगड) यांना दुखापत झाल्याचे नमूद आहे. अपघातानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार श्रेणी पोलीस गोंगेज यांच्याकडे देण्यात आला आहे. दाखल अंमलदार म्हणून पोलीस कर्मचारी राजिगरे यांची नोंद आहे.


107
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!