चंदगड येथील यर्तनहट्टी येथे महिलेवर विळ्याने हल्ला.


क्षुल्लक कारणावरून ३७ वर्षीय महिलेला मारहाण, चंदगड पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल.

चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

         कचरा टाकण्याच्या क्षुल्लक गैरसमजातून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन एका ३७ वर्षीय महिलेवर विळ्याने वार करून मारहाण केल्याची घटना यर्तनहट्टी (ता. चंदगड) येथे घडली आहे. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास यर्तनहट्टी येथील रहिवासी फिर्यादी यल्लव्वा सोमेश नाईक (वय ३७) यांच्या घरासमोरील गटारीत कोणीतरी कचरा टाकला होता. यावरून फिर्यादी आणि त्यांचे शेजारी यांच्यात वाद झाला.

“आम्ही इथेच कचरा टाकणार, तुला काय करायचे ते कर” अशी धमकी देत , भावकु शेट्याप्पा सनदी याने विळ्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपराच्या खालील भागावर वार करून त्यांना जखमी केले. तर यल्लव्हा शेट्याप्पा सनदी हिने शिवीगाळ केली आणि शेट्याप्पा भावकु सनदी याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या प्रकरणी यल्लव्हा नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदगड पोलीस ठाण्यात भावकु शेट्याप्पा सनदी, यल्लव्हा शेट्याप्पा सनदी आणि शेट्याप्पा भावकु सनदी (सर्व रा. यर्तनहट्टी, ता. चंदगड) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार (बकल नं. ३८९) नाईक करत आहेत.


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!