गडहिंग्लज बस डेपोच्या ताफ्यात ५ नवीन एसटी बसेस दाखल


प्रवाशांची सोय अधिक गतिमान होणार;

उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार.

गडहिंग्लज : गडहिंग्लज परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीने चंदगड विधानसभेचे लाडके आमदार शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्र शासनामार्फत गडहिंग्लज बस डेपोसाठी ५ नवीन एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या. या नवीन बसेसचा पूजन व लोकार्पण सोहळा  ना. हसन मुश्रीफ साहेब, आमदार शिवाजीराव पाटील. स्वातीताई कोरी, तसेच गडहिंग्लज व चंदगड येथील विविध मान्यवरांच्या आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

प्रवाशांना मिळणारे प्रमुख फायदे:

​ग्रामीण भाग जोडण्यास मदत: नवीन बसेसमुळे गडहिंग्लज आणि आसपासच्या ग्रामीण भागातील जोडणी अधिक मजबूत होईल.

​विविध घटकांना दिलासा: शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित व वेळेवर प्रवास करणे शक्य होणार आहे.

​प्रवास अधिक सोयीस्कर: जुन्या गाड्यांवरील ताण कमी होऊन डेपोची सेवा अधिक सक्षम आणि गतिमान होईल.

शिवाजीराव पाटील बोलताना म्हणाले कि, “चंदगड विधानसभेतील सर्व क्षेत्रातील विकास हाच त्यांचा ध्यास असून कोणत्याही तालुक्याला निधी अथवा सेवांचा तुटवडा भासू देणार नाही. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच विशेष लक्ष या विधानसभा मतदार संघावर आहे. त्यांच्या कडून या गोष्टीकडे लक्ष घालून बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या.”

​या सोहळ्याला एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करून प्रवाशांची सोय करण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही अविरत सुरू राहतील,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!