भरधाव सफारीची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू


गडहिंग्लज–चंदगड मार्गावर भीषण अपघात

गडहिंग्लज प्रतिनिधी: 

गडहिंग्लज–चंदगड मार्गावर हरळी खुर्द गावच्या हद्दीत शनिवारी (दि. ८) भरधाव टाटा सफारीने रस्त्याने पायी जाणाऱ्या तानाजी बापू पाटील (वय ४८, रा. हरळी खुर्द , ता. गडहिंग्लज) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी पाटील हे हरळी खुर्द येथून महामार्गाच्या दिशेने बाजारासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी जात होते. यावेळी गडहिंग्लजकडून चंदगडच्या दिशेने जाणाऱ्या टाटा सफारीने त्यांच्या शेतासमोर त्यांना पाठीमागून धडक दिली.

या अपघातात तानाजी पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अपघातास कारणीभूत ठरलेल्या टाटा सफारीचा क्रमांक (क्र. 25 BH 5612 C) असा आहे. या वाहनाच्या धडकेत तानाजी पाटील गंभीर जखमी झाले.

दरम्यान, या घटनेप्रकरणी यात्रेकरू अरुण पांडुरंग पाटील (वय ३९, रा. कडगाव) यांनी गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सफारी चालक जयेश उत्तम नाईक (रा. हेवाळे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास गडहिंग्लज पोलिस करीत आहेत.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!