आजरा-चंदगड मधील ४४ गावांवर विविध निर्बंध?


अधिसूचना जारी:सूचना मांडण्यासाठी ६० दिवसांची मुदत.

श्री.स्वप्निल कुंभार(उपसंपादक- चंदगड, आजरा व गडहिंग्लज):

          केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्रतील तील १७ हजार ३४० चौरस किमोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषीत केले आहे. यात चंदगड तालुक्यातील २२, आजरा तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे . 

२७ जुलै केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जल वायू परिवर्तन मंत्रालयाने सातवी अधिसूचना काढली आहे. व्याप्तीतील नागरिकांनी सूचना मांडाव्यात असे आवाहन केले आहे.

पश्चिम घाट इकॉलॉजीकल एक्स्पर्ट पॅनल या कै.माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने (गाडगीळ समिती) दिलेल्या अहवालावर अभ्यास करण्यासाठी, के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीचा अहवाल स्वीकारत केंद्र सरकारने २०१३ मध्ये याबाबत अधिसूचनेचा मसुदा जारी केला होता. मात्र या मसुद्यावर लोकांच्या सूचना घेण्यासाठी व विविध कारणास्तव तो पडून होता. ३ ऑक्टोबर २०१८ रोजी शेवटची अधिसूचना काढली होती. त्यावेळी कोरोना महामारीच्या काळात हा मसुदा तसाच पडून होता.आता केंद्र सरकारने पुन्हा इको सेन्सिटिव्ह झोनचा मसुद्या जारी केला आहे. त्यासाठी केंद्रीय पर्यावरण सरंक्षण कायदा १९८६ च्या कलम ५ व उपकलम (३) नुसार नागरिकांना सूचना सादर करण्यासाठी 60 दिवसाची मुदत देण्यात आली आहे.

चंदगड तालुक्यातील गावे:

भोगोली, धामापूर, खालसा गुडवळे, हाजगोळी, इसापूर, जांबरे, जेलूगडे, कळसगादे, कानुर खुर्द , खालसा म्हाळुंगे, किटवाड, कोदाळी, कोकरे, कोलिक, मिरवेल, नागवे, न्हावेली, पिळणी , पुंद्रा, सडे गुडवळे, उमगाव, वाघोत्रे आदी गावांचा यात समावेश आहे.

आजरा तालुक्यातील गावे:

आंबाडे, आवंडी, भावेवाडी, चाफवडे, चितळे, दर्डेवाडी, एरंडोल, गवसे हाजगोळी खुर्द, हळोली, जेऊर, केरकबोल, किटवडे, लाटगाव, मेढेवाडी, पारपोली, पोळगाव, सत्तेवाडी, सुळेरान, उचनगी, वेळवट्टी, विनायकवाडी.

कर्नाटकातील सर्वाधिक क्षेत्र कस्तुरीरंगन समितीने पश्चिम घाट क्षेत्रातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र व गुजरात या सहा राज्यातील ५९ हजार ९४० चौरस मीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक २०हजार ६६८चौरस किमोमीटर क्षेत्र हे कर्नाटकातील आहे.

काय होणार ?

आजरा व चंदगड तालुक्यात अमाप नैसर्गिक संपत्ती आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे त्याचे संरक्षण होण्याबरोबरच वन्य संपत्तीला संरक्षण मिळणार आहे. वृक्षतोडीवर र्निबध येणार असल्याने सौंदर्याचा खजिना जपला जाणार आहे.

कशावर निर्बंध?

खाणकाम: इको-सेन्सिटिव्ह भागात खाणकाम, उत्खनन आणि वाळू उत्खननावर पूर्ण बंदी असेल

थर्मल पॉवर प्लांट: कोणतेही नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प

उद्योग: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे तयार केलेल्या

लाल श्रेणीतील उधोगवर निर्बंध तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या विस्तारावर मर्यादा येतील.


3
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!