कालमनी भागात अर्ध्यातासहून अधिक काळ धुंवाधार पाऊस; नागरिकांची तारांबळ, मात्र गारव्याने दिलासा


कालमनी भागात अर्ध्यातासहून अधिक काळ धुंवाधार पाऊस; नागरिकांची तारांबळ, मात्र गारव्याने दिलासा

कालमनी (प्रतिनिधी): तालुक्यातील कालमनी भागात आज (शुक्रवार) अर्ध्यातासहून अधिक काळ धुंवाधार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली; मात्र वाढत्या उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा गारवा आणि दिलासा मिळाला आहे.

दिवसभर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर कालमनी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सुकलेल्या जमिनी थंड झाल्या आहेत. सध्या शेतात भात मळणीची कामे जोरदार सुरू असून, रताळी काढण्याची कामेही प्रगतीपथावर आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे या कामांवर काय परिणाम होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, हवामानाची स्थिती पाहता येत्या दोन दिवसांत तालुक्यातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!