आमटे कृषी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध: कसर्लेकरांनी राखला गड, पण विरोधकांच्या ‘दोघांमुळे सत्ताधाऱ्यांची दमछाक!


 

आमटे कृषी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध: कसर्लेकरांनी राखला गड, पण विरोधकांच्या ‘दोघांमुळे सत्ताधाऱ्यांची दमछाक!

कृष्णा भरणकर: कालमनी 

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात ज्या नावांची आणि डावपेचांची सर्वाधिक चर्चा रंगली होती, त्या आमटे कृषी पतसंस्थेच्या निवडणुकीचा पडदा अखेर बिनविरोध निवडीवर पडला आहे. विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांनी संस्था बिनविरोध करण्यात यश मिळवत आपला गड राखला असला, तरी या संपूर्ण नाट्यात ‘१० विरुद्ध २’ च्या समीकरणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्रही नसतो, याचा प्रत्यय या निवडणुकीने पुन्हा एकदा दिला आहे. नेत्यांच्या शब्दाला शब्द देऊन राजकारण ताणून धरणाऱ्या कार्यकर्त्यांना या घडामोडींमधून मोठा धडा मिळाला आहे. सुरुवातीला लक्ष्मण कसर्लेकर विरुद्ध जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी आमदार अरविंद पाटील असा थेट सामना रंगण्याचे चित्र होते. या चुरशीच्या वातावरणात रंगतदार डावपेचही पाहायला मिळाले.

मात्र, शेवटच्या टप्प्यात ‘मी नाही त्यातली अन् कडी लावली आतली’ अशी स्थिती निर्माण झाली. विशेषतः बिनकर्जदार मुद्द्यावरून निर्माण झालेला पेच आणि तांत्रिक-राजकीय गुंतागुंत पाहता, कसर्लेकर गटाला काही बाबींवर तडजोड करावी लागल्याची चर्चा आहे. विरोधकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपली ताकद दाखवून दिली. कमी वेळात आणि मर्यादित तयारीनिशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना दिलेला हा धक्का दुर्लक्ष करण्यासारखा नक्कीच नाही.

अखेर समजुतीच्या आणि राजकीय तडजोडीच्या राजकारणातून १० जागा सत्ताधारी कसर्लेकर पॅनलकडे, तर २ जागा माजी आमदार अरविंद पाटील पॅनलकडे गेल्याचे स्पष्ट झाले.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

कसलेकर पॅनल (१० जागा)

* १) निंगाप्पा बळजी

* २) नारायण गावडे

* ३) मारूती भरणकर

* ४) लक्ष्मण कसर्लेकर

* ५) राजाराम घाडी

* ६) रघुनाथ बामणे

* ७) अक्षता कसरलेकर

* ८) सुरेखा गावकर

* ९) सातेरी मादार

* १०) खाचू नाईक

माजी आ. अरविंद पाटील पॅनल (२ जागा)

* १) शिवाजी बळजी

* २) नारायण कालमणकर

राजकीय विश्लेषण: ‘गड’ वाचला, पण संदेश स्पष्ट!

माजी आमदार आणि डीसीसी बँकेच्या संचालकांचे राजकीय वजन व डावपेच झुगारून लक्ष्मण कसर्लेकर यांनी बहुमतासह सत्ता राखली हे खरे असले, तरी विरोधकांनी खेचून आणलेल्या दोन जागांनी ‘राजकारणात सगळंच माफ आणि शक्य असतं’ हेच अधोरेखित केले आहे. एकंदरीत, ही निवडणूक बिनविरोध पार पडली असली, तरी यातील राजकीय वळणे आणि पडद्यामागच्या घडामोडी आगामी स्थानिक राजकारणावर नक्कीचदूरगामी परिणाम करतील.

Advertise

Advertiss


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!