शिक्षक भरती नियमांत सुधारणा करून अधिसूचना जारी


शिक्षक भरती नियमांत सुधारणा करून अधिसूचना जारी

बंगळुरू : शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातील काही शिक्षक पदांच्या भरतीशी संबंधित नियमांमध्ये राज्य सरकारने सुधारणा करून अधिसूचना जारी केली आहे. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा सुधारणा नियमांवर नागरिकांकडून आलेल्या आक्षेपांची आणि सूचनांची तपासणी केल्यानंतर हे नियम तत्काळ लागू होतील अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत.

प्रमुख सुधारणा खालीलप्रमाणे:

मराठी किंवा उर्दू भाषेत प्रश्नपत्रिका: इयत्ता ६ वी ते ८ वीच्या पदवीधर प्राथमिक शाळा शिक्षक गटासाठी पेपर-१ (सर्वसामान्य पेपर) आणि पेपर-२ (विषयनिहाय पेपर) हे प्रश्नपत्रिका संच आवश्यकतेनुसार मराठी किंवा उर्दू भाषेत तयार केले जातील.

गुणांकन व वेटेज: चार वर्षांची एकात्मिक शिक्षक शिक्षण पदवी (इंटीग्रेटेड बी.एड. / समतुल्य) धारण करणाऱ्या उमेदवारांच्या टक्केवारी गुणांचे मूल्यांकन करताना स्पर्धा परीक्षेच्या गुणांना ८५ टक्के आणि एकात्मिक पदवीच्या गुणांना १५ टक्के वेटेज दिले जाईल.

भाषा शिक्षकांसाठी अर्हता: पदवीधर प्राथमिक शाळा शिक्षक (भाषा) पदासाठी डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रमात संबंधित भाषेचा अध्यापन अभ्यास / अध्यापन पद्धती पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

प्रौढ शाळा सहाय्यक शिक्षक: प्रौढ शाळा सहाय्यक शिक्षक पदांसाठी पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुणांसह शिक्षक पदवी किंवा ४ वर्षांची एकात्मिक शिक्षक शिक्षण पदवी असणे निश्चित करण्यात आले आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!