पुस्तकाच्या बहाण्याने बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार.


चंदगड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.

चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका  १२ वर्षाच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ पावले उचलत नराधम संशयित आरोपी ओंकार (बबलू) अशोक मुळीक (वय: २४ वर्षे )रा- मजेरे शिरगाव, या ताब्यात घेतले आहे. त्याच्या  विरुद्ध पोक्सो कायद्यासह (POCSO) विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२:१५ ते १२:३० या वेळेत मजेरे शिरगाव येथील त्याने आपल्या राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून मुलीच्या असहाय व अज्ञानपणाचा फायदा उचलला आणि अत्याचार केला.

माहितीनुसार, आरोपीने मुलीच्या घरी कॉल करून तिला पुस्तक घेऊन त्याच्या घरी पाठवून देण्यास सांगितले. मुलगी घरी पोहोचताच आरोपीने तिच्या अज्ञानाचा आणि बालपणाचा फायदा घेत तिला घराच्या वरच्या मजल्यावर बोलावून घेतले.  

 वर नेल्यानंतर आरोपीने मुलीच्या डोळ्यांवर पट्टी आणि टॉवेल बांधला. त्यानंतर “तुला काय दिसते ते सांग” असे म्हणत आणि “मी जी वस्तु तुला खायला देणार ती तू ओळख” असे सांगून तिच्या तोंडात मिठाई व सफरचंदाचे फोड घातले. त्यानंतर आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध आणि बालपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केला आहे.

गुन्हा दाखल व कायदेशीर कारवाई:

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून चंदगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(vi), ६५(१) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO) चे कलम ३, ४, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०:१० वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची पुढील कागदपत्रे व तपास मा. प्रथमवर्ग न्यायमूर्ती सो. चंदगड यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास पोसई आकाशदिप भोसले हे करत आहेत. या घटनेमुळे पंचक्रोशीत तीव्र संताप व्यक्त होत आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!