खानापूर तालुका काँग्रेस मध्ये मोठे बदल?


खानापूर तालुका काँग्रेस मध्ये मोठे बदल?

तरुणांना मिळणार नेतृत्वाची संधी!

सक्रिय कार्यकर्त्यांना मिळणार गव्हर्नमेट नॉमिनेशनची लॉटरी 

खानापूर: राजू कुंभार 

खानापूर तालुका काँग्रेस पक्ष संघटनेत आगामी काळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तवली जात आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांना सल्लागाराच्या भूमिकेत ठेवून, सक्रिय तरुण कार्यकर्त्यांवर नेतृत्वाची धुरा सोपवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

स्थानिक राजकीय वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जुन्या जाणत्या नेत्यांनी अनेक वर्षे काँग्रेसची विचारधारा जिवंत ठेवली. मात्र, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत तरुण कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि इतर पक्षांतून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यामुळे तब्बल ६६ वर्षांनंतर डॉ. अंजली निंबाळकर यांच्या रूपाने काँग्रेसला विजय मिळवता आला. या पार्श्वभूमीवर, पक्ष बांधणीत सक्रिय असलेल्या तरुण आणि होतकरू कार्यकर्त्यांना आता संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते.

शासकीय नियुक्त्यांम(नॉमिनेशन)ध्येही नवीन चेहऱ्यांना संधी

सूत्रांनी पुढे सांगितले की, राज्यातील काँग्रेस सरकारकडून तालुक्यातील नगरपंचायत, शासकीय पदवी व पदवीपूर्व महाविद्यालये, तसेच लँड ट्रिब्युनल यांसारख्या विविध समित्यांवर यापूर्वी करण्यात आलेल्या सरकारनियुक्त पदांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या रिक्त होणाऱ्या जागांवर आता पक्ष कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या तरुण कार्यकर्त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

वरिष्ठ नेत्यांकडून लवकरच निर्णय अपेक्षित

देशातील सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना जनता कंटाळली असून देशावर काँग्रेसची एकहाती सत्ता येणार यात शंका नाही. त्या अनुषंगाने वर्षानुवर्षे विरोधात राहून काँग्रेस विचारधारा जपणाऱ्या तरुणांना खऱ्या अर्थाने अछेदिन येणार आहेत.

देशातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुका लक्षात घेता, पक्ष संघटनेत नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून केला जात असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. या संभाव्य बदलांबाबत आणि नवीन नियुक्त्यांबाबत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बसवराज सिग्गावी आणि माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडून लवकरच अधिकृत निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या घडामोडींमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!