हलकर्णीत दिवाळी निमित्त भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा


हलकर्णीत दिवाळी निमित्त भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा

खानापूर: राजू कुंभार 

श्री कलमेश्वर युवक मंडळ व ग्रामस्थ हलककर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी दीपावलीच्या निमित्ताने मौजे हलककर्णी (ता. खानापूर) येथे एका भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक ०७ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडणार आहे.

स्पर्धेचे मुख्य आकर्षण व बक्षिसे:

कबड्डीप्रेमी आणि संघ मालकांसाठी ही स्पर्धा अत्यंत रोमांचक ठरणार असून, विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे:

प्रथम बक्षीस: ₹ २१,०००/- (एकोणिस हजार रुपये)

 दुसरे  बक्षीस: ₹ १५,०००/- (पंधरा हजार रुपये)

 तिसरे बक्षीस: ₹ ७,०००/- (सात हजार रुपये)

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रत्येक संघाला ₹ २,०००/- इतकी प्रवेश फी भरावी लागेल.

संपर्क माहिती:

स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे:

अनंत बेळगांवकर – ८१०५९१५१५४

 अरुण चौगुले – ९७४१९७००३४

 परशुराम गावडे – ८०८८९६५७४०

 आबा बेळगांवकर – ९६८६३६९०७०

तरी परिसरातील जास्तीत जास्त कबड्डी संघ व क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री कलमेश्वर युवक मंडळ व ग्रामस्थ हलककर्णी यांच्या वतीनेकरण्यात आले आहे.

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!