
९वी-१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा; गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी
राजू कुंभार: खानापूर
जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला व शैक्षणिक गुणवत्तेला मोठा वाव देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा पंचायत आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने २ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘शाळास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा’ दणक्यात पार पडणार आहे. या महा-परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या अचूक संख्येनुसार स्वतंत्र प्रश्नपत्रिका छापण्यात येणार आहेत.
परीक्षेचे स्वरूप आणि गुणविभागणी
१०० गुणांचा पेपर: ही परीक्षा एकूण १०० गुणांची असून पूर्णपणे बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असणार आहे.
प्रमुख विषयांचा भर: यामध्ये गणितासाठी १५%, विज्ञानासाठी १५% आणि समाज विज्ञानासाठी १०% गुण राखीव ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धा परीक्षेची धर्ती: उर्वरित प्रश्नांचे स्वरूप हे स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर आधारित असेल.
अचूक उत्तरपत्रिका: नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका आणि ओएमआर (OMR) उत्तरपत्रिका जिल्हास्तरावरून शाळांना पुरविल्या जाणार आहेत.
वेळापत्रक व नियोजित वेळ
२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेची वेळ खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:
इयत्ता नववी: सकाळी ११.०० ते दुपारी १.००
इयत्ता दहावी: दुपारी २.०० वाजता
३ टप्प्यांत होणार गुणवंतांची ‘महा-निवड’!
या प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तीन महत्त्वाच्या टप्प्यांत निवड केली जाईल:
शाळा स्तर: प्रत्येक सरकारी शाळेतील पहिल्या १० क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची नावे तालुकास्तरावर पाठवली जातील.
तालुका स्तर: तालुकास्तरावर पहिल्या ५० क्रमांकांत येणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट जिल्हास्तरीय परीक्षेचे तिकीट मिळेल.
जिल्हा स्तर: अंतिम टप्प्यात जिल्हास्तरावर गुणवत्तेची कडक चाचणी घेऊन महा-गुणवंतांचा शोध घेतला जाईल.
पारदर्शक वातावरणात परीक्षा! परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी यासाठी सर्व शाळांना आवश्यक भौतिक सुविधा व सीसीटीव्ही देखरेख (CCTV) वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षेच्या दिवशी संबंधित पंचायत विकास अधिकारी (pdo) तसेच शिक्षण विभागाचे सर्व मुख्य अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून या उपक्रमावर लक्ष ठेवणार आहेत.
Advertise,……..


