
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोफत चारा बियाणे वाटप सुरू
खानापूर: राजू कुंभार पशू संगोपन विभागाच्या वतीने खानापूर तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे (मिनीकिट) वाटप करण्यात येणार आहे. हे मिनीकिट ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केले जाणार असून, ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन पशु संगोपन विभागाचे सहायक संचालक डॉ. मनोहर दादमी यांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
* आधार कार्डचे झेरॉक्स
* जमिनीच्या उताऱ्याची झेरॉक्स
* फ्रुट आयडी झेरॉक्स प्रत
संपर्क कुठे साधावा
पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पशू संवर्धन विभाग, खानापूर येथे लवकरात लवकर संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Advertise


