काय आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना, किती सबसिडी जाणून घ्या 


काय आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना, किती सबसिडी जाणून घ्या 

हेस्कॉम उपविभागात १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान नावनोंदणी

खानापूर: राजू कुंभार

केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्य घर : मोफत वीज योजने’चा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी खानापूर हेस्कॉम उपविभाग कार्यालयात विशेष नावनोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जे नागरिक आपल्या घरावर सौर ऊर्जा संच (सोलर सेटअप) बसवू इच्छित आहेत, त्यांनी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान खानापूर हेस्कॉम उपविभाग कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन आपली नावनोंदणी करावी आणि योजनेविषयीची आवश्यक सविस्तर माहिती मिळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले.अध्यक्षस्थानी सहायक कार्यकारी अभियंता इंजि. प्रवीण बरगाले उपस्थित होते.

सोलर सेटअपचे प्रकार, खर्च आणि सरकारी अनुदान:

शासनाकडून १, २, ३ ते १० किलो वॅटपर्यंतचा सोलर सेटअप बसविण्यासाठी आकर्षक अनुदान (सबसिडी) उपलब्ध करून दिली जाते:

  १ किलो वॅट सोलार सेटअप:

वीज निर्मिती: महिन्याला अंदाजे १२० युनिट वीज मिळते.

अंदाजे खर्च: १ लाख ते १ लाख २० हजार रुपये.

* सरकारी सबसिडी: ३० हजार रुपये.

२ किलो वॅट सोलार सेटअप:

* वीज निर्मिती: महिन्याला अंदाजे २४० युनिट वीज मिळते.

* अंदाजे खर्च: १ लाख ६० हजार ते १ लाख ८० हजार रुपयांपर्यंत.

* सरकारी सबसिडी: ९० हजार रुपये.

३ किलो वॅट सोलार सेटअप

* वीज निर्मिती: महिन्याला अंदाजे ३६० युनिट वीज मिळते.

* अंदाजे खर्च: २ लाख ते अडीच लाख रुपयांपर्यंत.

* सरकारी सबसिडी: ७८ हजार रुपये.

अतिरिक्त वीज विक्रीची सुवर्णसंधी:

घरी जितकी वीज लागते, ती सर्व वापरून झाल्यानंतर उरलेली अतिरिक्त वीज हेस्कॉम कंपनीकडून २ रुपये १४ पैसे प्रति युनिट दराने खरेदी केली जाते, ज्यामुळे नागरिकांची अतिरिक्त कमाई देखील होऊ शकते.

सुलभ बँक कर्ज व वॉरंटी:

* सुलभ कर्ज: यातील कोणतेही सोलर सेटअप बसविण्यासाठी बँकेकडून कोणत्याही अतिरिक्त प्रोसेसिंग फीशिवाय ५ ते ७ टक्क्यांनी (हप्त्यांनी) सुलभ लोन उपलब्ध करून दिले जाते.

* दीर्घकालीन वॉरंटी: हे सर्व सेटअप टाटा कंपनीचे असून, कंपनीकडून यावर २५ वर्षांची दीर्घ मुदतीची वॉरंटी मिळते.

आवश्यक कागदपत्रे व निकष:

* कागदपत्रे: वीज बिल, आधार कार्ड, आणि रेशनकार्ड.

* जागा: घर मजबूत असावे आणि सोलर पॅनेलसाठी सावली नसणारी (शॅडो फ्री) सूर्यप्रकाशाची जागा असणे आवश्यक आहे.खानापूर परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान हेस्कॉम उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाची सुरुवात श्री रंगनाथ यांच्या स्वागतपर भाषणाने झाली, तर आभार प्रदर्शन श्री गोपाल देशपांडे यांनी मानले.यावेळी श्री प्रमोद कोचेरी, श्री महेश कुडले, श्री रवी काडगी,तसेच हेस्कॉमचे अधिकारी श्री भरतेश नागनूर, श्री धर्मदास, श्री सिद्धू अंगडी, श्री जावेद नायकवडी, श्री नागेश देवलतकर, श्री चकडीमठ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertise……


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!