इदलहोंड ग्रा.पं.च्या वॉटरमनकडून ट्रक चालकास बेदम मारहाण;


इदलहोंड ग्रा.पं.च्या वॉटरमनकडून ट्रक चालकास बेदम मारहाण

छातीसह गुप्तअंगावर गंभीर दुखापत

खानापूर / प्रतिनिधी

इदलहोंड ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सिंगीनकोप गावच्या वॉटरमन आणि त्याच्या मुलाने जुन्या रागातून गावातीलच एका तरुण ट्रक चालकास लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या छातीसह गुप्तअंगावर गंभीर दुखापत झाली आहे.

सागर परशुराम कुंभार (रा. सिंगीनकोप) असे जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या मारहाणीनंतर तरुणाची प्रकृती बिघडल्याने त्यास तातडीने उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जाताना अंगावर धूळ उडाली या किरकोळ कारणावरून सदर वॉटरमनच्या मनात सागरबद्दल राग होता. याच जुन्या राग मनात धरून वॉटरमन आणि त्याच्या मुलाने एकत्र येऊन सागर परशुराम कुंभार याच्यावर अचानक हल्ला केला. त्याला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.

पोलिसांत माहिती दाखल

या गंभीर मारहाणप्रकरणी पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी तात्काळ खानापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे.  ग्रामीण भागात अशा प्रकारे किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!