कुंभार गल्लीतील आकर्षक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा यंदा ३१ वा नवरात्रोत्सव


१५ व १६ ऑक्टोबर रोजी धार्मिक विधी, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन; भाविकांनी उपस्थित राहण्याचे मंडळाचे आवाहन.

चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

   चंदगड येथील आकर्षक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुंभार गल्ली यांच्या वतीने यंदाच्या नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवार, दि. १५ व शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाची स्थापना १९९६ मध्ये झाली असून यंदा मंडळाचा ३१ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपत मंडळाकडून दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, देवीपीठ स्थापना व ग्रहयज्ञ हे विधी पार पडणार आहेत. त्यानंतर कुंकुमार्चनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सकाळी ११ वाजता सर्व सुवासिनींकडून हा धार्मिक विधी संपन्न होणार आहे.

शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत चंडी होम, कुष्मांड बली, कुमारिका पूजन व पूर्णाहुती हे धार्मिक विधी होणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकर्षक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुंभार गल्ली, चंदगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाप्रसादासाठी अन्नदान करण्यासाठी संपर्क :

नितीन कुंभार-86525 76497  अजिंक्य कुंभार-97645 25524 रमेश कुंभार-87932 80056 अभि कुलकर्णी-94042 61209


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!