मंगळवारी भाजपच्या वतीने रक्तदान शिबिर


मंगळवारी भाजपच्या वतीने रक्तदान शिबिर

खानापूर: राजू कुंभार 

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खानापूर तालुक्याच्या वतीने मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज भाजप तालुका मध्यवर्ती कार्यालयात महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

ही सभा भाजपचे तालुका अध्यक्ष श्री. बसवराज सानीकोप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. प्रमोद अण्णा कोचेरी, जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय कुबल, सेवा संकल्प अभियानाचे तालुका संचालक श्री. ज्योतिबा रेमानी, भाजप सरचिटणीस श्री. मल्लाप्पा मारीहाळ, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. पंडित ओगले, जिल्हा चिटणीस श्री. सुनील मड्डीमनी आणि तालुका उपाध्यक्ष श्री. मोहन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

या सभेला भाजप नेते श्री. अजित पाटील, श्री. नारायण गुरव, श्री. बंटी बुवाजी, श्री. रवी पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हे रक्तदान शिबिर अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी आणि शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले.

Advertise…


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!