चंदगड तालुक्यातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण.


बुक्कीहाळ येथील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार 

चंदगड तालुक्यातील बुक्कीहाळ येथून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीचे वडील शंकर परशराम पाटील (वय ४६, व्यवसाय – शेती, रा. बुक्कीहाळ, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

​     पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, ही घटना २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी तिच्या राहत्या घरातून अचानक गायब झाली. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन एका अज्ञात इसमाने तिला काहीतरी आमिष दाखवून किंवा फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.४५ वाजता पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

​अपहृत मुलीचे वर्णनात्मक तपशील:

​वय: १७ वर्षे ८ महिने  

​रंग व बांधा: गोरा रंग, उंची ५ फूट ४ इंच, अंगाने सडपातळ  

​केस: काळे आणि लांब  

​पहराव: लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात उंच टाचेची चप्पल आणि गळ्यात हिरव्या रंगाचा दोरा  

​भाषा: मराठी व कन्नड भाषेचे ज्ञान  

​पोलीस तपास सुरू:

चंदगड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये (गुन्हा रजि. नं. ३१९/२०२६) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पीएसआय गेंगे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. सदर वर्णनाची मुलगी अथवा या घटनेबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने चंदगड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!