उद्या विश्वभारती तर्फे सरकारी शाळा वाचवा अभियान व विद्यार्थी प्रबोधन;


उद्या विश्वभारती तर्फे सरकारी शाळा वाचवा अभियान व विद्यार्थी प्रबोधन;

विश्वभारती संघटनेतर्फे खानापुरात भव्य सोहळ्याचे आयोजन!

खानापूर प्रतिनिधी:

विश्वभारती कला क्रीडा संघटना, शाखा खानापूर यांच्या वतीने रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता, शिवस्मारक, खानापूर येथे ‘चौथी सामुदायिक सभा’ व भव्य विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तळागाळातील विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर नेणे, विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त बनवणे आणि सर्व सरकारी मातृभाषा शाळा टिकवून जपण्याचा संदेश देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:

विद्यार्थी प्रबोधन: विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी पुण्यातील प्रमुख वक्ते श्री गीतन गिंडे विशेष व्याख्यान देणार आहेत.

विशेष सन्मान सोहळा: या प्रसंगी खेळाडू सत्कार समारंभ, आदर्श शिक्षक सन्मान व बेस्ट सामाजिक कार्यकर्ते सन्मान सोहळा पार पडणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती:

या कार्यक्रमाला श्रीमंत राणी सरकार सौ. धनश्री कर्णसिंह सर देसाई (जांबोटीकर), राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री आबासाहेब दळवी, गुरुवर्य श्री एम. जी. गाडी सर, गुरुवर्य श्री नारायण गुरव सर, श्री थॉमस डिसोझा, श्री प्रकाश चव्हाण सर, श्री धनंजय पाटील सर, श्री दिनकर मरगाळे, श्री पिराजी कुराडे सर, श्री रावजी बिरजे सर, श्री भर्माजी पाटील, श्री राजू सिद्धाने, ज्योतिबा सुतार, पांडुरंग वरकडकर, गावडे पाटील, रमेश पाटील, धर्माजी नंदनकर, जोतिबा अंधारे, संजय कांबळे, संतोष पाटील, रवींद्र मंडलिक, राजू कोल्हापुरे, प्रशांत लकेबैलकर, जनकाप्पा पाटील, अजित पाटील व किशोर हेबाळकर यांसह अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन गुरुवर्य श्री तमन्ना पाटील करणार असून शिस्त व्यवस्थेची जबाबदारी गुरुवर्य श्री परब सर सांभाळतील.

लहान विद्यार्थ्यांपासून डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, सर्व सरकारी मातृभाषा शाळांच्या सुधार कमिटीने व पालकांनी या प्रबोधनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी सैनिक अनिल देसाई व विश्वभारती कला क्रीडा संघटना, खानापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!