चंदगडमध्ये मानाच्या पाचही गणेशोत्सव मंडळांचा गणरायाला भावपूर्ण निरोप!


चंद्रसेन गणेशोत्सव मंडळाचे केरळचे चेंडा बाळगा वाद्य मिरवणुकीतील प्रमुख आकर्षण; पोलीस व प्रशासनाच्या चोख नियोजनाचे नागरिकांकडून कौतुक.

 चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील चंदगड शहरात गणरायाचा विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. चंदगडमधील मानाच्या पाचही गणपतींना निरोप देण्यासाठी शहरासह परिसरातील आजूबाजूच्या गावांतील भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

​नाविन्यपूर्ण वाद्य आणि डीजेचा जल्लोष:

मिरवणुकीत नाविन्यता जपणाऱ्या ‘चंद्रसेन गणेशोत्सव मंडळाने’ यावर्षी केरळचे प्रसिद्ध ‘चेंडा बाळगा’ वाद्य आणून चंदगडची संपूर्ण बाजारपेठ गाजवून सोडली. तर दुसरीकडे उत्कर्ष गणेशोत्सव मंडळ, साई गणेश मंडळ, रामदेव गणेश मंडळ आणि रवळनाथ गणेशोत्सव मंडळ या इतर मानाच्या मंडळांनी डीजेच्या तालावर तरुणाईला थिरकवत मिरवणुकीत जोरदार जल्लोष केला.

८ ते ​१२ तास चालली मिरवणूक 

दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या मानाच्या पाचही मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अत्यंत दिमागदारपणे चंदगड नगरीतून ताम्रपर्णी घाटाकड  मार्गस्थ झाल्या. भाविकांचा हा उत्साह आणि जल्लोष पहाटे २ ते ३ वाजेपर्यंत अविरत सुरू होता.

​शांततेत सोहळा पार; प्रशासनाचे कौतुक:

कुठलाही भांडण-तंटा न होता संपूर्ण विसर्जन मिरवणूक अत्यंत निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडली. पोलीस आणि प्रशासनाने दिलेल्या उत्कृष्ट सेवा आणि चोख बंदोबस्ताबद्दल चंदगडच्या नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!