डॉ. सतीश घाळी यांना “आदर्श संस्थाचालक” पुरस्कार


शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवनात पुरस्कार सोहळा संपन्न

गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री. स्वप्निल कुंभार.

विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लजचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांना त्यांच्या शैक्षणिक व संस्थात्मक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक’ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्मृती भवन, कोल्हापूर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. 

शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढीला प्राधान्य देत, विद्यार्थी व शिक्षकांचे हित आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण योगदान देणारे डॉ. सतीश घाळी यांना हा पुरस्कार मा. खासदार धनंजय महाडिक, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जी. के.थोरात यांच्या शुभहस्ते देण्यात आला. यावेळी श्री स्वामी विवेकानंदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे,शिक्षक नेते दादा लाड, सुरेश खोत, के. एस. ढोमसे, शिवाजी कामथे, राहुल कुंभार, बी.डी. पाटील, बी.एस. खामकर, संजय चोरमारे यांच्यासह मुख्याध्यापक उमेश सावंत, शिवाजी अनावरे, पंडित पाटील, दिनकर गुरव,अजित देसाई, अनिल मसाळे, महंतेश दड्डी,प्रा. गुरुलिंग खंदारे, वैजनाथ पालेकर, अमित हिरेमठ, प्रकाश गायकवाड, उदय पवार, बबन कोळी उपस्थित होते.


107
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!