राहुल पाटीलांची गर्लगुंजी कृषी पत्तीनवर निवड 


राहुल पाटीलांची गर्लगुंजी कृषी पत्तीनवर निवड 

खानापूर : राजू कुंभार 

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (DCC Bank) कडून खानापूर तालुक्यातील गलगुंजी येथील ‘प्राथमिक कृषी पत्तीन’च्या संचालक मंडळावर बँकेचे प्रतिनिधी म्हणून श्री. राहुल अशोकराव पाटील (रा. गलगुंजी) यांची नामनिर्देशन (Nomination) द्वारे निवड करण्यात आली आहे.

बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या ठराव क्रमांक १६ अन्वये ही नियुक्ती करण्यात आल्याचे बँकेचे अध्यक्ष यांनी अधिकृत पत्राद्वारे कळवले आहे. या नियुक्तीची प्रत गलगुंजी संस्थेच्या अध्यक्षांना पाठवण्यात आली असून, यापुढे संस्थेच्या सर्व बैठकांच्या नोटीस व महत्त्वाचे कागदपत्रे श्री. राहुल पाटील यांना पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या निवडीची प्रत बँकेचे संचालकमाजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील व नवनिर्वाचित संचालक श्री. राहुल पाटील यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. राहुल पाटील यांच्या या निवडीबद्दल संस्थेने त्यांचा नुकताच सत्कार केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष विनोद कुंभार, संचालक गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, हणमंत मेलगे, शांताराम मेलगे, राजू सिद्धानी, वनिता पाटील, माधुरी सिद्धानी, सुभाष पाटील, शिवाजी कोलकार, व्यवस्थापक अभिनव नीटूरकर,सचिव सातेरी बिर्जे आदी उपस्थितहोते.

राहुल पाटील यांच्याकडे कर्तबगार उदयोन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जाते,गावच्या कामात हिरीरीने भाग घेत त्यांनी समस्या मार्गी लावल्या आहेत. या निवडीमुळे त्यांची आणखी जबाबदारी वाढली आहे.

Advertise…


107
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!