माणिकवाडी नजिक जटग्याच्या जवानाचा भीषण अपघात
राजू कुंभार
आज रात्री सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास माणिकवाडी परिसराजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. या अपघातात जटगा येथील रहिवासी आणि भारतीय सैन्यदलात (आर्मी) कार्यरत असलेले ऑन ड्युटी जवान युवराज मळीक (३०) आणि मोहिनी मळीक यांचा अपघात घडला. कालच हा जवान सुट्टीवर आला होता.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८:३० च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना खानापूर रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Views: 718




