25 लाखाचा रस्ता खड्ड्यात!गणपतीत रास्ता रोको


25 लाखाचा रस्ता खड्ड्यात!गणपतीत रास्ता रोको

खानापूर: राजू कुंभार

25 लाख रूपये खर्चून प्रधान मत्री ग्राम सडक योजने’अंतर्गत बांधलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याने अस्तित्व गमावले आहे. ७ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास गणपती उत्सवादरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ओतोळी (ता.खानापूर) येथिल नागरिकांनी दिला आहे.

खानापूर-जांबोटी रस्त्या पासून वतोळी गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम PM सडक योजनेतून झाले आहे.काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून चिखल साचला आहे. यामुळे शाळकरी मुले व रुग्णवाहिकांना मोठा त्रास होत आहे.

रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून. ठेकेदाराणे साहित्यात हलगर्जीपणा केल्याचा आणि स्थानिक अभियंत्याने वेळेवर पाहणी न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावकऱ्यांनी तहसील कार्यालयात लेखी निवेदन दिले असून ७ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास गणपती उत्सवादरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य परशराम विठ्ठल गावडे, संजय रामनीचे परशराम हुडीदार, परशराम नेमाने गावडे, लक्ष्मण शिंगाळे ,मोहन गावडे ,शिवाजी पाटील, अनंत गावडे व सर्व गावकरी उपस्थीत होते.

संजय रामनीचे

 “आमच्या गावाला नेहमीच दुर्लक्षीत केले जाते. २५ लाख खर्च करूनही दर्जाहीन काम म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. अशी प्रतिक्रिया समाज सेवक संजय रामनीचे यानी दिली.

Advertise


113
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!