पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षणविश्वातील एक युग संपले


देशभरातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात शोककळा; अंत्यदर्शन व अंत्यसंस्कारासाठी मान्यवरांची मोठी उपस्थिती

 

कोल्हापूर प्रतिनिधी:श्री स्वप्निल कुंभार.

           पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या जाण्याने देशाच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शिक्षणाचा प्रसार ग्रामीण भागापासून ते देशभर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर मोलाचे कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक संस्था, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन आणि विविध व्यावसायिक महाविद्यालयांची स्थापना झाली. दर्जेदार शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

त्यांच्या निधनानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच हजारो नागरिकांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. डी. वाय. पाटील यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान आणि समाजसेवेचा वारसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच सर्वांची प्रार्थना.


0
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!